नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्ये रवी दुबे दिसणार लक्ष्मणाच्या भूमिकेत?; रवीनेच केला खुलासा

    06-Dec-2024
Total Views |
 
ramayan
 
 
 
मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण हा चित्रपट गेल्या अनेक काळापासून प्रतिक्षेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्री राम यांची तर साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार याबद्दल विविध माहिती समोर येत असताना लक्ष्मणच्या भूमिकेत अभिनेता रवी दुबे दिसणार असे म्हटले जात होते. आता, स्वत: रवी याने याबद्दल खुलासा केला आहे.
 
कनेक्ट सिनेला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान, रवी दुबेने रामायण चित्रपटात तो काम करणार आहे की नाही यावर आता शिक्कामोर्तब केले आहे. रवी म्हणाला की, " हो मी रामायण चित्रपटात लक्ष्मण ही भूमिका साकारत आहे. मला वाटले की या प्रोजेक्टमध्ये पावित्र्य आहे आणि नितेश सर, नमित सरांनी यासंदर्भात घोषणा करण्यासाठी काही योजना आखल्या असतील. तर मी लोकांसमोर काही चुकीचं बोललो तर ते बरोबर दिसणार नाही. परंतु 'नाही' म्हणणे फारच चुकीचे ठरेल म्हणून मी त्यांची परवानगी घेतली आणि मी त्यांना म्हणालो की हा प्रश्न विचारला तर मी काय सांगू, त्यावर त्यांनी हो सांग म्हटल्यावर मी आता सांगतोय की या चित्रपटात मी काम करतो आहे”.
 
दरम्यान, रणबीर कपूरसोबत काम करताना रवी म्हणाला की, रणबीर कपूरसारख्या 'मेगास्टार'सोबत काम करण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. तो दयाळू, प्रेमळ, शांत आहे आणि सर्वांप्रती असलेला आदर छान आहे..” मात्र, अजूनही लक्ष्मणाची भूमिका तोच साकारत आहे का याबद्दल रवीने काहीही भाष्य केले नाही. नितेश तिवारींचा ‘रामायण’ चित्रपट दोन भागांत विभागला गेला असून पहिला भा २०२६ ला प्रदर्शित होणार आहे तर दुसरा भाग २०२७ ला प्रदर्शित होणार अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.