कल्याण : इंडियन मेडिकल अससोसिएशन, कल्याण तर्फे ‘पिढ्यांतर-एक पाऊल संवादाचं’ या कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता ‘आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण’ येथे हा कार्यक्रम होणार आहे. दिग्दर्शक सुशील शिरोडकर यांनी या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले आहे. डॉ. नंदू मूलमुले आणि डॉ. राजेंद्र बर्वे या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री डॉ. समीरा गुजर-जोशी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि लावणी किंग आशिष पाटील या कार्यक्रमाला पाहुणे कलाकार म्हणून हजर राहणार आहेत. अधिक माहितीसाठी ९३७२४८९३५७ या क्रमांकावर संपर्क साधावा.