आपकडून भाजपविरोधात कॅम्पसाठी पंकज त्रिपाठींचा व्हिडिओ मॉर्फ

    06-Dec-2024
Total Views |
 
pankaj tripathi
 
 
मुंबई : कलाकारांचे व्हिडिओ किंवा त्यांचे चेहरे वापरुन ते मॉर्फ करत त्याचा गैरवापर करण्याचे अलिकडे प्रमाण फार वाढले आहे. अशात २०२५ मध्ये दिल्लीत होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत अभिनेते पंकज त्रिपाठी भाजप पक्षा विरोधात प्रचार करताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ खरा नसून आम आदमी पार्टीने पंकज यांच्या जाहिरातीमधील एक व्हिडिओ मॉर्फ करुन भाजप विरोधात पंकज बोलत आहेत असं दाखवण्यात आलं आहे.
 
पंकज त्रिपाठी यांच्या व्हायरल झालेल्या या खोट्या व्हिडिओचं सत्य समोर आलं आहे. खऱ्या व्हिडिओमध्ये युपीआय सुरक्षा जागरुकतेचा एक भाग म्हणून पंकज त्रिपाठी व्हिडिओमध्ये केवळ युपीआय फसवणूकीपासून कसं वाचलं पाहिजे याबद्दल बोलत आहेत. यात भाजपच नव्हे तर कुणल्याही राजकीय पक्षाचा उल्लेख नाही आहे.
 
दरम्यान, आगामी २०२५च्या निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून आम आदमी पक्षाने पंकज त्रिपाठी भाजपच्या विरोधात प्रचार करत असलेला खोटा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
 
दरम्यान, आप राजस्थान आणि आप सीलमपूरच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटसह इतरांनी देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार २०२३ मध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पंकज त्रिपाठींसोबत करार करुन त्यांची नियुक्ती युपीआय सुरक्षा दूत म्हणून केली होती.