‘पुष्पा २’च्या शो वेळी मुंबईतील चित्रपटगृहामध्ये अज्ञाताने फवारला विषारी गॅस

    06-Dec-2024
Total Views |

pushpa 2 
 
 
मुंबई : रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जूनची प्रमुख भूमिका असणारा 'पुष्पा २: द रुल' हा चित्रपट तेलुगू भाषेसह हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला. देशभरातून या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत असून सर्व शो हाऊसफुल्ल जात आहेत. प्रेक्षकांना तिकिट न मिळाल्यामुळे संतापाने काही जागी लोकांनी दगडफेक देखील केली होती. अशात आता मुंबईतील एका चित्रपटगृहात अज्ञात इसमाने विषापी गॅस फवारल्याची माहिती मिळत आहे.
 
मुंबईतील बांद्रा येथील गेटी गॅलक्सी चित्रपटगृहात पुष्पा २ चित्रपटाचा शो हाऊसफुल सुरु होता. दरम्यान मध्यांतरानंतर लोकं पु्न्हा चित्रपटगृहामध्ये आले तेव्हा सर्वांना अचानक खोकला यायला लागला. त्याचं कारण असं होतं की, एका अज्ञाताने थिएटरमध्ये विषारी गॅस फवारला होता. त्यामुळे शो १५ मिनिटे थांबवण्यात आला. तात्काळ पोलिस घटनास्थळी दाखल होत त्यांनी तपासणी सुरु केली.
 
‘पुष्पा २'ने ओपनिंग डेच्या दिवशी तब्बल १६५ कोटींची कमाई केली. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा २' चित्रपटाने प्रदर्शनाच्या आदल्या दिवसापासून म्हणजेच ४ डिसेंबरपासून रात्री उशीर विविध ठिकाणी चित्रपटाचे शो आयोजित केले होते.