मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Muhammad Yunus Bangladesh Currency) इस्लामिक कट्टरतावाद आणि पाकिस्तानच्या विचारसरणीला अनुसरुन चालणाऱ्या बांगलादेशच्या युनुस सरकारने शेख मुजिबुर रहमान यांचा इतिहास वारंवार पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. शेख मुजिबुर रहमान हे बांगलादेशच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. युनुस सरकारने बांगलादेशी चलनावरील याच शेख मुजिबुर रहमान यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
बांगलादेशी माध्यमांच्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या सेंट्रल बँकेने नव्या नोटांची छपाई नुकतीच सुरू झाली आहे. १००, २००, ५०० आणि १००० च्या नोटांची छपाई सुरु झाली असून नव्या नोटांवर सत्तापालटाची छायाचित्रे छापण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय या नोटांवर बांगलादेशातील मशिदी आणि इतर धार्मिक स्थळांची छायाचित्रे छापण्यात येणार आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने २९ सप्टेंबर रोजी सेंट्रल बँकेला या नोटांचे डिझाइन बदलण्यास सांगितले होते. येत्या ६ महिन्यांत या नोटा बाजारात येतील, अशी माहिती आहे.