बांगलादेशात हिंदू अत्याचाराने गाठली परिसीमा, अल्पवयीन मुलाला इशनिंदेच्या आरोपाखाली डांबलं तुरूंगात

न्यायालयाकडून बालकारागृहात राहण्याची शिक्षा

    06-Dec-2024
Total Views |
 

Hindu 
 
ढाका : बांगलादेशात हिंदूंवरील अन्याय अत्याचाराचे सत्र सुरूच आहे. बांगलादेशातील दिनाजपूर येथे एका अल्पवयीन हिंदू मुलाला अटक करण्यात आली आहे. मुलावर धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने बालकारागृहात राहण्याची शिक्षी दिली आहे.
 
मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेशात दिनाजपूर येथून हिंदू अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. तो इयत्ता आठवीचा विद्यार्थी आहे. अर्पण दास असे त्याचे नाव सांगण्यात आले आहे. मोहम्मद अब्दुल मतीन यांनी ईशनिंदा प्रकरणात त्यांच्याविरोधात एफआरआय दाखल केली आहे. याप्रकरणात सायबर सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. यानंतर न्यायालयाने बालसुधागृहात रवानगी केली असे सांगण्यात येत आहे.
 
दरम्यान बांगलादेश ईशनिंदाने केलेल्या आरोपाखाली हिंदूंना अटक करण्यात आल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अशीच एक घटना चितगावा येथे घडली होती. युनूस सरकार सत्तेवर आल्यानंतर बांगलादेशात इस्लामिक कट्टरतावादात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती आहे.