मुंबई : मराठी ग्रंथसंग्रहालय व बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने १ जानेवारी २०२५ ‘ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग’ सुरू करण्यात येत आहेत. या वर्गाचा कालावधी सहा महिन्यांचा असून शनिवार, रविवार असे दोन दिवस व ५ तास हे वर्ग दादर, मुंबई येथे होणार आहेत. प्रत्यक्ष ग्रंथालयाच्या कामाकाजाची प्रात्यक्षिके या वर्गात शिकायला मिळणार आहेत. अनुभवी शिक्षक आणि तज्ञांकडून हे वर्ग घेतले जाणार आहेत. या वर्गाची विद्यार्थी मर्यादा ६० आहे. या वर्गात प्रवेश घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या वर्गांसंबंधी अधिक माहिती ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व) येथे संपर्क साधावा.