कंटाळलेल्या आणि मनातून संतप्त झालेल्या सुज्ञ मतदारांनी विरोधकांच्या या कटकारस्थानांचा सोक्षमोक्ष लावल्यानंतर, देवेंद्र यांच्या नेतृत्वातच राज्याच्या विकासाची गाडी रूळावर येण्यास वेळ लागणार नाही. किंबहुना, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि देवेंद्र आणि अजित पवार यांच्या साथीने, ती गेल्या अडीच वर्षांत आल्याचे जनतेने बघितले होते. आता हा वेग संतुलित ठेवण्याचा आणि जनतेची कामे गतीने पूर्ण करण्याचा काळ सुरू झाल्याची भावना, तीन आश्वस्त चेहर्यांमुळे निर्माण झाली आहे, असे म्हणायला बराचसा वाव आहे. एकनाथ शिंदे यांचे लोकांमध्ये जाऊन मिसळणे, अजित पवारांच्या निर्णायक कार्यशैलीचा धडाका आणि देवेेंद्र यांचे सर्वांना सोबत घेऊन जनतेपर्यंत कल्याणकारी कार्य नेणे ही कार्यपद्धती लोकांनी ओळखली होती, म्हणूनच हे सुदिन आले. आता जनतेला हे सुसंस्कृत कर्तृत्वाचे फळ मिळाले, असे मोठे समाधान आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आता आपल्या राज्याचा कारभार सुरू झाला आहे. संत-महंताचे आशीर्वाद घेत, आद्यदेवता श्रीगणेशाचे दर्शन आणि गोमातेचे पूजन करीत, त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याला हवा असलेला, जनतेला हवा असलेला, एक आश्वस्त असा सुसंस्कृत चेहरा त्यांच्या रुपात कार्यरत झाला. गेल्या काही काळात राज्यातील राजकीय संस्कृतीत आलेले घाणेरडे वादळ आता शमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यातील जनतेने मतदानातून याची सुरुवात करून दिली आणि आपल्या सुसंस्कृत राज्याच्या राजकीय संस्कृतीत, पुन्हा एकदा खेळीमेळीचे आणि राज्याच्या नावाला शोभेल असे राजकीय वातावरण तसेच कार्यसंस्कृती बघायला मिळेल, असे संकेत मिळू लागले आहेत. जसे निसर्ग आपल्याला प्रत्येक ऋतूतून त्याच्या आल्हाददायी आगमनाचे संकेत देत असतो, तसेच काहीसे या निमित्ताने आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षम व्यक्तिमत्त्वातून मिळू लागले आहेत. त्यांनी आजतागायत केलेली लोकांची सेवा आणि राजकीय वर्तन हे जनतेने बघितले असल्याने, आणि त्या तुलनेत त्यांच्या विरोधकांनी त्याच्यांशी केलेला अतिरेकी विरोध लक्षात आल्यान, आता आपल्या राज्याच्या प्रगतीला साजेशी वातावरणनिर्मिती या निमित्ताने सुरू झाल्याचे म्हणता येईल. रोजची एकमेकांवरील गरळ आणि नेहमी त्यालाच माध्यमांमधून दिली जाणारी प्रसिद्धी , यामुळे कंटाळलेल्या आणि मनातून संतप्त झालेल्या सुज्ञ मतदारांनी विरोधकांच्या या कटकारस्थानांचा सोक्षमोक्ष लावल्यानंतर, देवेंद्र यांच्या नेतृत्वातच राज्याच्या विकासाची गाडी रूळावर येण्यास वेळ लागणार नाही. किंबहुना, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि देवेंद्र आणि अजित पवार यांच्या साथीने, ती गेल्या अडीच वर्षांत आल्याचे जनतेने बघितले होते. आता हा वेग संतुलित ठेवण्याचा आणि जनतेची कामे गतीने पूर्ण करण्याचा काळ सुरू झाल्याची भावना, तीन आश्वस्त चेहर्यांमुळे निर्माण झाली आहे, असे म्हणायला बराचसा वाव आहे. एकनाथ शिंदे यांचे लोकांमध्ये जाऊन मिसळणे, अजित पवारांच्या निर्णायक कार्यशैलीचा धडाका आणि देवेेंद्र यांचे सर्वांना सोबत घेऊन जनतेपर्यंत कल्याणकारी कार्य नेणे ही कार्यपद्धती लोकांनी ओळखली होती, म्हणूनच हे सुदिन आले. आता जनतेला हे सुसंस्कृत कर्तृत्वाचे फळ मिळाले, असे मोठे समाधान आहे.
दुष्कृत्याची मळमळ
मागील काळात 2019 सालच्या निवडणूक निकालानंतर राज्यात विश्वासघाताच्या राजकारणाने प्रवेश केला आणि त्याचे दुष्परिणाम नाहक जनतेला भोगावे लागले. पाच वर्षांच्या उखाळ्या-पाखाळ्या आणि काड्या करण्याच्या कृत्याने जेरीस आलेल्या जनतेने संधीचे सोने करून, त्यावेळी जनतेचा कौल बदनाम करणार्यांना घरी बसवून चांगलाच धडा दिला असे म्हणायला खूप वाव आहे.राजकारणात आपली हयात घालविलेल्या एका महान व्यक्तीने, हे कारस्थान त्या काळात घडवून आणले होते आणि आता बघा, त्या व्यक्तीच्या कुटुंबातील राजकारणदेखील बदनाम झाले असून, त्यांच्या कारनाम्यांना जनतेनेदेखील चोख उत्तर दिले आहे. ज्यांनी खोटा आव आणून वारंवार एक खोटे सांगण्यासाठी, हजार वेळा खोटे बोलत आपली राजकीय कारकीर्द संपुष्टात आणली, त्यांनी देखील आपल्या नावानुरूप ‘अजब तुझे सरकार’ अशी भावना जनतेत निर्माण करून, स्वतःच्याच पायावर आणि पक्षावर कुर्हाड मारून घेतली आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणून, या दोन्ही पक्षांना आपली शकले झाल्याचे शल्य कायम रूजवून ठेवण्यातच, आता धन्यता मानावी लागत आहे. काळ दुष्टांना कसा धडा शिकवितो, हे याचे तंतोतंत उदाहरण आहे. ‘जैसे करम करेगा वैसे’नुसार, हे दोन्ही पक्ष आता आपले भोग भोगत आहेत. त्यांच्या या दोन्ही नेत्यांना आता जनतेसमोर तोंड दाखवायला देखील जागा उरली नाही, अशी अवस्था होऊन बसली आहे. सत्ता मिळाल्यावर चक्क राजकीय सुसंस्कृतपणाला वेशीवर टांगून, या नेत्यांनी जो काही अडीच वर्षे धुमाकूळ घातला, तो जनतेच्या मनात रोष खदखदत ठेवणाराच होता. जाहीर सभांमधून एक नेता, राज्याला शोभणार नाही असे बोलताना, तर एक नेता घरात बसून राज्यातील समाजात दुफळी होईल, असे उपद्व्याप करण्यात मश्गूल असल्याची भावना जनतेत निर्माण होत होती. निव्वळ हेच नाही, तर सत्तेत असतानाची यांची अतिमहत्त्वाकांक्षा आणि विरोधात गेल्यावरदेखील यांनी माजविलेले राजकीय संस्कृतीला साजेसे नसणारे स्तोम जनतेला नक्कीच रूचले नाहीत. गलिच्छ भाषेचा वापर करून, यांनी मराठी भाषेच्या अभिजाततेलादेखील लज्जित केले. इतकी हीन पातळी या लोकांनी गाठली होती. ही या दुष्कृत्याची मळमळ आता बाहेर आणण्यात मतदार यशस्वी झाला.
अतुल तांदळीकर