‘पुष्पा २’ च्या निर्मात्यांना धक्का; ‘या’ प्लॅटफॉर्म्सवर ऑनलाईन लीक झाला चित्रपट

05 Dec 2024 18:01:50
 
pushpan
 
 
मुंबई : सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जून अभिनिक पुष्पा २ : द रुल हा चित्रपट देशभरात तेलुगू भाषेसह हिंदी, तमिळ, कन्नडा आणि बंगासी भाषेत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रदर्शनापुर्वीच प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आणि आता बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बक्कळ कमाई देखील केली आहे. मात्र, चित्रपटाचा निर्मात्यांना मोठा धक्का लागला आहे कारण हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे.
 
‘पुष्पा २’ अखेर तीन वर्षांनी प्रदर्शित झाला आहे. सगळीकडे अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या या चित्रपटाचीच चर्चा पाहायला मिळत आहे. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत असताना चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यामुळे चिंतेचं वातावरण तयार झालं आहे.
 
पुष्पा २ प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी अवघ्या काही तासांमध्येच लीक झाल्यामुळे निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. पायरसी प्लॅटफॉर्मवर 1080p, 720p, 480p, 360p, 240p, HD क्वॉलिटीमध्ये लीक झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
 
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, Ibomma, Movierulz, Tamilrockers, Filmyzilla, TamilYogi, Tamilblasters, Bolly4u, Jaisha Moviez, 9xmovies आणि Moviesda या टोरेंट प्लॅटफॉर्म आणि पायरसी वेबसाइट्सवर हा चित्रपट लीक झाला आहे.
Powered By Sangraha 9.0