'देवेंद्रजी आमचा अभिमान'; लाडक्या बहिणीची फडणवीसांसाठी खास मेहंदी!

05 Dec 2024 16:17:51
 
ladki bahin mehendi
 
मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा भव्यदिव्य सोहळा ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच या शपथविधीला दहा हजार लाडक्या बहिणी उपस्थित राहणार असून त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
 
बुधवार, ४ डिसेंबर रोजी जेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला, तेव्हा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सागर या शासकीय निवासस्थानावर अनेकांनी गर्दी केली. त्यातच नागपूरहून एक लाडकी बहिणही आली होती. तिने तिच्या हातांवर देवेंद्र फडणवीसांसाठी खास मेहंदी काढली होती. मेहंदीने एका हातावर फडणवीसांची प्रतिमा तर दुसऱ्या हातावर 'देवेंद्रजी आमचा अभिमान' असे लिहिले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0