लाडक्या भावांना आशीर्वाद दयायला आलोय !

05 Dec 2024 22:38:11

ladki bahin
मुंबई, दि.५: प्रतिनिधी महायुतीच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानात राज्यभरातून उपस्थितांची तौबा गर्दी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी सोहळा रंगला. राज्याच्या कानोकोपर्यातून आलेले कार्यकर्ते आणि नागरिकांनी या सोहळ्याची शान वाढविली.


या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण राज्यातील लाडक्या बहिणी असणार ठरल्या. लाडक्या बहिणींसाठी आरक्षित आसनव्यवस्था करण्यात आली होती.या शपथविधी सोहळ्याला लाडक्या बहिणींनी भगव्या रंगच्या साड्या परिधान केल्या होत्या. यासोबतच कमळ आणि भाजप चिन्ह असणाऱ्या साड्या परिधान केलेल्या महिला कार्यकर्त्या या सोहळ्यात लक्ष वेधून घेत होत्या.भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होत्या.

वडाळा येथील पुष्पा कदम म्हणाल्या, "आम्ही वडाळा मधून आलोय. जवळपास आम्ही ५०० महिला आलो आहोत. खूप आनंद वाटतो आहे. लाडक्या बहिणी म्हणून आम्हाला सन्मान दिला जातोय. आमच्या भावांना आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे." तर वडाळा येथीलच सुषमा देसाई म्हणाल्या,"आमचे लाडके देवाभाऊ परत तिसऱ्यादा शपथ घेत आहे. आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे. ते म्हणाले होते की मी पुन्हा येईल. ते त्यांनी जिद्दीने करून दाखवलं आहे." अंधेरीतील कोमल सप्रे म्हणाल्या, "आम्हाला लाडकी बहीण योजनेतुन जी मदत या सरकारने दिली त्याबद्दल त्यांचे आभार! आज आमचे भाऊ शपथ घेणात आहेत आम्हाला खूप आनंद वाटतोय."
-
Powered By Sangraha 9.0