"....त्यांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला"; शपथविधी पूर्वी देवेंद्र फडणवीसांचे मोठं वक्तव्य

05 Dec 2024 17:27:42

Devendra fadnavis 
 
मुंबई : (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा भव्यदिव्य सोहळा ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर पार पडणार आहे. त्यांच्यासोबत अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर एकनाथ शिंदे हेदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रि‍पदासाठी पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर त्यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
 
"मी त्यांचा पुन्हा बदला घेणार आहे. त्यांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला"
 
याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी केलेल्या बदनामी संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर "मी त्यांचा पुन्हा बदला घेणार आहे. त्यांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला", असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
 
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मी स्वल्प काय, अन् दीर्घ काय मी कोणताही द्वेषी कधीही नव्हतो. आपल्या राजकारणाच्या सोईसाठी काही नेत्यांनी माझी खलनायकी प्रतिमा तयार करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. विधानसभा निवडणुकीत महायुतीवर, भाजपवर आणि माझ्यावर जनतेने मोठा विश्वास टाकला आणि विरोधकांना परस्पर सडेतोड उत्तर दिल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0