प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाऊंडेशनतर्फे ‘प्रेरणा’ प्रदर्शनाचे आयोजन
05-Dec-2024
Total Views |
मुंबई : प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘प्रेरणा’ प्रदर्शन ११ डिसेंबर पासून जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुरू होणार आहे. १६ डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
प्रसिद्ध प्रफुल्ला डहाणूकर यांच्या निधनानंतर त्यांचे पती दिलीप डहाणूकर यांनी प्रफुल्ला यांच्या स्मरणार्थ प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील निवडक उदयोन्मुख चित्रकारांना शिष्यवृत्ती दिली जाते. ज्यायोगे युवा कलाकारांना त्यांच्या कला क्षेत्रातील प्रवासासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसेच या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता चित्रप्रदर्शनीमधून त्यांच्या कलाकृती जगासमोर आणण्याची संधीही दिली जाते. ‘प्रेरणा’ या प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रफुल्ला आर्ट फाऊंडेशनाच्या कलानंद शिष्यवृत्तीने सन्मानित चित्रकरांच्या चित्रांचे प्रदर्शन याच कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरीत भरविण्यात येणार आहे.