पुण्यात ‘नृत्यदर्पण’ या १६ व्या अखिल भारतीय राष्ट्रीय नृत्य महोत्सवाचे आयोजन

    05-Dec-2024
Total Views |

नटराज
 
पुणे, दि. ५ : अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ तर्फे ‘नृत्यदर्पण’ या १६ व्या अखिल भारतीय राष्ट्रीय नृत्य स्पर्धा आणि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २१ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान पुण्यात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्यासाठी अंतिम तारीख १५ डिसेंबर आहे. भरतनाट्यम, कथ्थक, ओडिसी, कुचीपुडी, मोहिनीअत्तम, रवींद्रनाट्यम, आंध्रनाट्यम, पेरिनीनाट्यम, सत्तरिया, मणीपुरी, सेमीक्लासिकल, भारतीय लोकनृत्य, बॉलीवुड, हिपहॉप आणि कन्टेम्पररी असे विविध नृत्यप्रकार या स्पर्धेत सादर करता येणार आहेत. ‘सुपर मॉम’ हा नवीन विभाग या वर्षी या स्पर्धेत सांमविष्ट करण्यात आला आहे.  ५ ते ९ वर्षे, १० ते १५ वर्षे, १६ ते २१ वर्षे आणि २२ वर्षे आणि त्यावरील अशा चार वयोगटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. अधिक माहितीसाठी आणि या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ८३९०८५६७९१ या क्रमांकावर संपर्क साधावा.