मेट्रो ३चा दुसरा टप्पा वेगाने पूर्णत्वाकडे

प्रकल्पाची ८८ टक्के कामे पूर्ण

    05-Dec-2024
Total Views |

metro3


मुंबई, दि.५ : 
भूमिगत मुंबई मेट्रो ३चा बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. बीकेसी ते कफ परेड असा २१.३५ कि.मी.च्या या टप्प्याची ८८.०१ टक्के कामे पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. दरम्यान, मुंबई भूमिगत मेट्रो मार्गिकेचा आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा सुरु झाला आहे. तर बीकेसी ते कफ परेड असा एकूण १७ स्थानकांसह दुसरा टप्पा प्रगतीपथावर आहे. दुसरा टप्पा २१.३५ कि.मी. इतक्या अंतराचा आहे. या टप्पा सुरु झाल्यावर दोन गाड्यांमधील कालावधी ३.२ मिनिटे असेल. दुसऱ्या टप्प्यातील गाड्यांची संख्या २२ गाड्या इतकी असेल.

दुसरा टप्पा : बीकेसी ते कफ परेड

स्थानक आणि बोगदे : ९९.०१ टक्के

स्थानकांचे बांधकाम : ९७.६ टक्के

सिस्टीम वर्क : ५८ टक्के

मेनलाईन ट्रॅक : ९९.१ टक्के

ओसीएस वर्क : ५७.१ टक्के