मेट्रो स्थानकांवरील स्वछतागृहांची माहिती ॲपद्वारे

मुंबई मेट्रोसाठीही आता टॉयलेट सेवा ऍप

    05-Dec-2024
Total Views |

mumbai metro
मुंबई, दि.५ : मुंबई मेट्रो ७ आणि २ए मार्गावरील ३० मेट्रो स्थानकांवर सार्वजनिक स्वच्छता पुरवण्याकरीता मुंबई मेट्रोने ‘टॉयलेट सेवा ॲप’ यांच्या सहकार्याने स्वच्छ्ता उपक्रम राबवला आहे. या ॲपद्वारे मेट्रो स्टेशनवरील ‘टॉयलेट’ची संपूर्ण माहिती प्रवाशांना तात्काळ मिळू शकणार आहे. तसेच मेट्रो प्रवासी ‘टॉयलेट’ संदर्भातील समस्या याॲपद्वारे नोंदवू शकणार आहेत. मुंबई मेट्रोकडे ‘टॉयलेट’ संदर्भात प्राप्त होणाऱ्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. प्रवाशांचा अभिप्राय आमच्यासाठी मोलाचा ठरणार आहे. मुंबई मेट्रो स्थानकांवरील ‘टॉयलेट’ सेवेचा लाभ घेण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा आणि ‘टॉयलेट सेवा ॲप’ डाऊनलोड करा, असे आवाहन महा मुंबई मेट्रो ऑपरेशनल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे.