मुंबई, दि. ५ : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय)ने आपला नाविन्यपूर्ण डिजिटल रोड सेफ्टी लर्निग प्लॅटफॉर्म ई-गुरूकुल लाँच केला. याप्रसंगी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी याची प्रमुख उपस्थित होते. हा उपक्रम भारतातील रस्ता सुरक्षिततेच्या संस्कृतीला चालना देण्याप्रती एचएमएसआयच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो.
होंडामधील प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती दाखवून याकार्यक्रमाची शोभा वाढली, ई-गुरूकुल प्लॅटफॉर्म तीन विशिष्ट वयोगटांसाठी डिझाइन करण्यात आलेले प्रशिक्षण मॉड्यूल्स देतो, ज्यामधून रस्ता सुरक्षा शिक्षणाप्रती सर्वसमावेशक दृष्टिकोनाची खात्री मिळते. सध्या, मॉड्यूल्स कन्नड, मल्याळम, हिंदी, तेलुगु, तमिळ व इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये उपलब्ध आहेत. विविध शहरांसाठी लाइव्ह स्ट्रिमिंग, द्वितीय श्रेणीच्या शहरांसाठी डाऊनलोड करता येणारे कन्टेन्ट आणि विविध प्रांतांमध्ये उपलब्धतेच्या खात्रीसाठी बहुभाषिक मॉड्यूल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.लाँच करण्यात आलेले ई-गुरूकुल २०५० पर्यंत शून्य वाहतूक अपघाताच्या होंडाच्या जागतिक दृष्टिकोनाप्रती योगदान देण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.
उपक्रम श्रेणी पुढीलप्रमाणे
1. ५ ते ८ वर्ष वयोगटासाठी: ७-मिनिट मॉड्यूल
2. ९ ते १५ वर्ष वयोगटासाठी: ९-मिनिट मॉड्यूल
3. १६ ते १८ वर्ष वयोगटासाठी: ७-मिनिट मॉड्यूल