मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गुरुवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप स्पष्टता नव्हती. मात्र, आता शिंदेसुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री असतील हे आता स्पष्ट झाले आहे.
जर एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली नाही तर आम्हीही मंत्रीपद स्वीकारणार नाही, अशी भूमिका शिवसेना नेते उदय सामंत यांनी घेतली होती. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. ही भेट यशस्वी ठरली असून या भेटीनंतर आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे वाचलंत का? - जर एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली नाही तर आम्हीही मंत्रीपद स्वीकारणार नाही : उदय सामंत
अवघ्या काही तासांत मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर अनेक महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. मात्र, मंत्रिमंडळाच्या शपथविधीबाबत अद्याप स्पष्टता नाही.