हिमाचल प्रदेश : जलेश्वर फाउंडेशन, ओडिसा तर्फे ९ व्या आंतरराष्ट्रीय दोन दिवसीय कला प्रदर्शनाचे आयोजन ‘कांगडा कला संग्रहालय, धरमशाला’ येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनात भारत, नेपाळ आणि मंगोलियातील सुमारे ३४ चित्रकारांनी काढलेली अतिशय आकर्षक, संदेशवाहक आणि जीवनाची कला दर्शविणारी चित्रे ठेवण्यात आली आहेत. जलेश्वर आर्ट फाऊंडेशन, इको टुरिझम सोसायटी तर्फे आयोजित या प्रदर्शनाचे आज हिमाचल प्रदेश सरकारचे सदस्य आणि पर्यटन व्यावसायिक संजीव गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
“धर्मशाळा ही पर्यटननगरी असून येथे येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकारांना त्याचा नक्कीच फायदा झाला पाहिजे. तसेच येथील पर्यटन व्यवसायिकांनी आपल्या पर्यटकांना या प्रदर्शनात जरूर आणावे जेणेकरून त्यांना ही दुर्मिळ चित्रे पाहता येतील.” अशी प्रतिक्रिया उद्घनाच्या वेळी गांधी यांनी व्यक्त केली.