मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर त्यांनी सकाळी सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात केली.
हे वाचलंत का? - देवाभाऊका असली पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; चित्रा वाघ यांची पोस्ट चर्चेत
देवेंद्र फडणवीसांनी सकाळी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, सिद्धीविनायक ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी आणि शिवसेनेचे नेते सदा सरवणकर उपस्थित होते. यानंतर ते मुंबादेवीचे दर्शन घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. सायंकाळी ५ वाजता देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. दरम्यान, शपथविधी सोहळ्याच्या आधी त्यांनी बाप्पाचे आशीर्वाद घेतले.