कल्याण, दि. ५ : १६० वर्षे अविरत सेवा देणारे सार्वजनिक वाचनालय कल्याण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पु. भा. भावे व्याख्यानमाले अंतर्गत पु. ल. देशपांडे यांच्या ‘असा मी असामी’ या पुस्तकावर आधारित ‘मनोरंजन बुस्टर’ या एकपात्री भन्नाट विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार ८ डिसेंबर रोजी सार्वजनिक वाचनालय कल्याण येथे सायंकाळी ५ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनेते सुबोध चितळे या विनोदी कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. अधिकाधिक लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.