केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल!

05 Dec 2024 16:13:18
 
Amit Shah
 
मुंबई : राज्याच्या नवीन सरकारच्या शपथविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. लवकरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या भव्य शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदान सज्ज झाले आहे.
 
हे वाचलंत का? -  महायुतीच्या ६ आमदारांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द!
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीचे तिन्ही नेते सायंकाळी ५ वाजता शपथ घेणार आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री मुंबईत दाखल झाले आहेत. आतापर्यंत राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे मुंबईत दाखल झाले असून इतर अनेक मान्यवर शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होणार आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0