मुंबई : सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जून अभिनीत पुष्पा २ या चित्रपटाची ३ वर्षांपासून प्रेक्षक वाट पाहात होते. अखेर ५ डिसेंबर २०२४ रोजी पुष्पा २ : द रुल हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला असून लवकरच पुष्पा ३ येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पुष्पा २ चित्रपटासाठी प्रेक्षकांना तीन वर्ष वाट पाहावी लागली होती. आता पुष्पा ३ साठी किती वेळ वाट पाहावी लागणार हे समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुकुमार अभिनेता राम चरणच्या एका नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यामुळे पुष्पा ३च्या प्रोडक्शनला सुरू होण्यासाठी कमीत कमी ४ वर्षांचा कालावधी लागणार आहे. ‘पुष्पा ३ : द रॅम्पेज’ चे चित्रिकरण २०२८ किंवा २०२९ मध्ये सुरू होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, तिसऱ्या सीक्वलमध्ये अभिनेता विजय देवरकोंडा अल्लू अर्जुनसोबत झळकणार असे देखील दिसून येत आहे. त्यामुळे 'पुष्पा-द राइज', 'पुष्पा-द रूल' आणि आता 'पुष्पा-द रॅम्पेज' प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणार याच शंकाच नाही.