बांगलादेशात ७०० कैदी फरार, लष्कर कैद्यांना पकडण्यास ठरले असमर्थ

05 Dec 2024 20:22:44
 
Bangladesh
 
 
ढाका : शेख हसीना यांचे ऑगस्ट महिन्यादरम्यान सरकार बरखास्त करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता. तुरूंगातून पलायन झाल्याच्या घटनेनंतर बांगलादेशात तब्बल ७०० कैदी फरार झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये काही इस्लामिक आणि मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात येणाऱ्या कैद्यांचा यामध्ये समावेश आहे. याप्रकरणाची माहिती संबंधित अधिकाऱ्यानी दिली आहे. यामुळे शेख हसीना यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर बांगलादेशी लष्कर आरोपींना पकडण्यासाठी आणि कैद्यांना शिक्षा देण्यासाठी असमर्थ ठरले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
 
याप्रकरणी ब्रिगेडियर जनरल सय्यद मोहम्मद मोतहिर हुसैन या अधिकाऱ्यांनी माहिती सांगितली आहे. ते म्हणाले की, देशभरातील विविध कारागृहात सुमारे २.२०० कैदी बाहेर पडले असून त्यापैकी ७०० कैदी अजूनही मुक्तपणे फिरत आहेत. मात्र यावेळी पुन्हा एकदा कायद्यांतर्गत अंमलबजावणी करत पुन्हा अटक करण्यात आली आहे.
 
याप्रकरणात आता विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात निदर्शने केली होती. शेख हसीना यांना जुलै महिन्यात झालेल्या विवादातील नोकरी कोटा प्रणालीत बांगलादेशी विद्यार्थी एकवटले. यामुळे शेख हसीना यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. याप्रकरणामुळे बांगलादेशात अराजकता निर्माण झाली. हिंदूंवर अन्याय अत्याचार होऊ लागले होते. काहीजण तुरूंगातून बाहेर पळून गेल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. तर यावेळी १७४ अतिरेकी गटाच्या ओळखीच्या लोकांना ५ ऑगस्टनंतर कोर्टातून जामीन मिळाला. याप्रकरणात पोलीस मागावर लक्ष ठेऊन असले तरीही ते आरोपींना पकडण्यास अपयशी ठरले अशी माहिती तुरूंग रक्षक अधिकाऱ्याने माहिती दिली होती.
 
बांगलादेशात हिंसाचार पसरत असताना कारागृहात हल्ला करण्याच्या अनेक घटना समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान १९ जुलै रोजी मध्य बांगलादेशातील नरसिंगडी येतील जिल्ह्यामध्ये कारागृहातून ८२६ कैदी पळून गेले होते. त्यावेळी घटनास्थळी जाळपोळ करण्यात आली होती. तेव्हा कागदपत्रांची ही जाळण्यात आली होती. यामुळे अराजकतेच्या परिस्थितीत संवेदनशील परिस्थिती अटोक्यात आणण्यााठी बांगलादेशी लष्कर असमर्थ ठरले आहेत.
Powered By Sangraha 9.0