स्वप्नील जोशीने खरेदी केली डिफेंडर गाडी, पहिला फोटो शेअर करत म्हणाला की…

    04-Dec-2024
Total Views |
 
swapnil joshi
 
 
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा अभिनेता स्वप्नील जोशी याने त्याच्या चाहत्यांना नुकतीच एक आनंदाची बातमी दिली आहे. २०२४ हे वर्ष संपण्यापुर्वी त्याच्या घरी नव्या पाहूणीचं आगमन झालं आहे. आणि ती पाहूणी म्हणजे नवी कोरी आलिशान डिफेंडर गाडी. इतकी महागडी गाडी घेतल्यानंतर अखेर माझी स्वप्नपुर्ती झाल्याची प्रतिक्रिया स्वप्नील जोशीने दिली आहे.
 

swapnil joshi 
 
स्वप्नील जोशीने खरेदी केलेल्या डिफेंडर या गाडीची किंमत कोटींच्या घरात आहे. त्याने आपल्या दाडीची पहिली झलक शेअर कर पोस्ट केली आहे की, “तर, आज (३ डिसेंबर) ही खास गोष्ट घडली. डिफेंडर…माझी नवीन गाडी, स्वप्नपूर्ती”. दरम्यान, स्वप्नील गाडी खरेदी करण्यासाठी गेला असताना त्याच्या आजूबाजूला गाजलेल्या चित्रपटांमधील त्याच्या संवादांचे पोस्टर लावण्यात आले होते.
 
स्वप्नीलच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास नुकताच तो ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात झळकला होता. आणि आता लवकरच तो ‘जिलबी’ आणि ‘सुशीला-सुजीत’ या चित्रपटातही झळकणार आहे.