नाशिक : दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्र सेविका समिती, नाशिकचे सघोष पथसंचलन ( Path Sanchalan ) होणार आहे. रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी नाशिकरोड परिसरात सेविकांचे पथसंचलन होणार आहे.
शिखरेवाडी मैदानातून सायंकाळी ४ वाजता संचलनाला सुरूवात होऊन, पुन्हा शिखरेवाडी मैदानातच संचलनाचा समारोप होणार आहे. सुरुवातीला मान्यवर अतिथींच्या हस्ते ध्वजपूजन होणार आहे. या मंगलमय आणि चैतन्यमय संचलन कार्यक्रमाला सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
तसेच अधिक माहितीसाठी ९८२००६७९५६ किंवा ९४२३५०७६१३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राष्ट्र सेविका समितीतर्फे करण्यात आले आहे.
संचलनाचा मार्ग
शिखरेवाडी मैदान-बालाजी मंदिर-नंदन पार्क सोसायटी-गंधर्वनगरी रिक्षा स्टॅण्ड-यशोविधाता-छत्रपती शिवाजी पुतळा-चंदन अपार्टमेंट-विद्याविनायक मंदिर-नवीन मराठी शाळा-अनुग्रह बंगला यशोविधाता-रेणुका बंगला-गजानन महाराज मंदिर-सौरभ खानावळ-लोकमान्य नगर-लोकमान्य उद्यान-मैत्रेय अपार्टमेंट-शिखरेवाडी मैदान