एमएसएमई नवउद्यमींसाठी कॅनरा बँकेचा क्लस्टर आउटरीच उपक्रम!

    04-Dec-2024
Total Views |
msme canarna bank new intitaitve


मुंबई :       सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेली कॅनरा बँक क्लस्टर आधारित कर्ज देण्यावर विचार करत आहे. या माध्यमातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना(एमएसएमई) मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, क्लस्टर आधारित कर्ज देण्यावर भारत सरकार भर देत असून वित्त सेवा विभाग(डीएफएस) अर्थ मंत्रालय, सिडबी आणि आरबीआयने एमएसएमईमध्ये २५ टक्के वाढ देण्यासाठी क्लस्टर आउटरीच कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.



हे वाचलंत का? -   लिएंडर पेस स्थापित 'फ्लाइंग मॅन व्हेंचर्स'च्या सीईओपदी अपूर्वा सरकार यांची नियुक्ती!


कॅनरा बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या निर्देशांनुसार कॅनरा बँकेच्या प्रादेशिक कार्यालय ठाणे येथे दि. ०६ डिसेंबर २०२४ रोजी भिवंडी क्लस्टर (मशीन टूल्स, पॅकिंग मटेरियल आणि पॉवर लूम्स, उल्हासनगर क्लस्टर (रेडीमेड, होजरी आणि कन्फेक्शनरी) आणि ठाणे क्लस्टर (फार्मा आणि इंजिनिअरिंग) येथे एमएसएमई क्लस्टर आउटरीच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या डीएफएसच्या निर्देशांनुसार देशभरातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या(एमएसएमई) वाढीला चालना देण्यासाठी एमएसएमई ग्राहकांपर्यंत वित्तीय सेवांपर्यंत पोहोचणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यासोबतच कॅनरा बँकेकडून संबंधित समूहांच्या सर्व ग्राहकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत असून देशाच्या विकासासाठी एमएसएमई कर्जदारांना पाठिंबा देण्याची संधी बँक देत आहे.