शनिवारी पार पडणार विनय आपटे प्रतिष्ठान तर्फे आयोजित लघुपट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा

04 Dec 2024 18:23:19

vinay aapte
 
मुंबई : विनय आपटे प्रतिष्ठान तर्फे आयोजित लघुपट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवार ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार विलेपार्ले येथील साठये महाविद्यालयात होणार आहे. या सोहळ्यात विजयी लघुपटांचे प्रदर्शन सुद्धा होणार आहे.
दिवंगत ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते विनय आपटे यांच्या १० व्या स्मृतीदिनानिमित्त ‘विनय आपटे प्रतिष्ठान’ तर्फे लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २५ वर्षाखालील आणि २५ वर्षावरील अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
Powered By Sangraha 9.0