नवी मुंबई, दि. ४ : ध्रुपद वर्तुळ ट्रस्ट आणि रजा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शरदोत्सव’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता ‘ध्रुपद वर्तुळ भवन, नवी मुंबई केंद्र, सेक्टर ३१ वाशी, नवी मुंबई-४००७०३’ या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. पंडित चंद्रशेखर वझे, पंडित पुष्पराज कोष्टी, पंडित उदय भवळकर आणि ट्रॉइली दत्ता व मोईसिली दत्ता या भगिनी या कार्यक्रमात सादरीकरण करणार आहे. अधिकाधिक संगीत रसिकांनी या सांगितिक मेजवानीचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी भूषण कोष्टी यांच्याशी संपर्क साधावा.