मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र आणि गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचे आणि टपाल तिकीटांचे दर्शन घडवणारे ‘महापेक्स २०२५’ हे राज्यस्तरीय भव्य प्रदर्शन २२ ते २५ जानेवारी दरम्यान मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये भरणार आहे. या प्रदर्शनाच्या बोधचिन्हाचे उद्घाटन काही दिवसांपूर्वीच पोस्टमास्टर अमिताभ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या वर्षीचे बोधचिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरित आहे. वारली चित्रकला आणि महाराष्ट्र व गोव्याचा स्थापत्य वारसा या बोधचिन्हात दाखवलेला आहे. जवळपास ५०० प्रकारची टपाल तिकिटे या प्रदर्शनात पाहता येणार आहेत.
‘महाराष्ट्र आणि गोव्यातील वन्यजीव’ या विषयावर छायाचित्रण स्पर्धा आणि ‘२०४७ मध्ये भारत’ या विषयावर टपालपत्र तयार करण्याची स्पर्धा या प्रदर्शनादरम्यान होणार आहे.