ठाणे : ग्रंथाली तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाचकदिनाचे आयोजन करण्यात आले आहे. २३ ते २५ डिसेंबर दरम्यान ठाण्यात हा वाचनदिन होणार आहे. ग्रंथालीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे हा वाचकदिन ग्रंथाली आणि वाचक दोघांसाठी खूप खास असणार आहे. या वाचनदिनाचा आरंभ ग्रंथदिंडीने होणार आहे आणि सांगता अशोक हांडे यांच्या सांगितिक कार्यक्रमाने होणार आहे. सोबतच मुलांसाठी, तरुणांच्या अभिव्यक्तीसाठी विविध कार्यक्रम, स्पर्धा, चित्र-व्यंगचित्र, सिनेमा-साहित्य आदी प्रदर्शने, मुलाखती, प्रकाशने, प्रात्यक्षिके आणि कार्यशाळा या वाचकदिनानिमित्त भरणार आहेत. अधिकाधिक वाचकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रंथाली तर्फे करण्यात आले आहे.