- संपूर्ण नाव - देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस
- जन्म : दि. 22 जुलै 1970
- वय : 54
- पत्नी : अमृता फडणवीस
- मुलगी : दिविजा फडणवीस
- शिक्षण : नागपूर विद्यापीठातून विशेष गुणवत्तेसह कायद्याचे शिक्षण पूर्ण. व्यवस्थापनशास्त्राची पदवी. ‘डीएसई बर्लिन’ या जर्मनीतील संस्थेतून ‘डिप्लोमा इन मेथड्स अॅण्ड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ ही पदव्युत्तर पदवी प्राप्त.
राजकीय टप्पे
- 1989 : वॉर्ड अध्यक्ष, भाजयुमो
- 1990 : पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम
- 1992 : अध्यक्ष, नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा
- 1992 ते 2001 : सलग दोन टर्म नागपूर महापालिकेचे सदस्य, दोनवेळा नागपूरचे महापौर. ‘मेयर इन काऊन्सिल’ पदावर फेरनिवड’ असा सन्मान मिळणारे राज्यातील एकमेव.
- 1994 : प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
- 1999 : ते आतापर्यंत सलग पाचवेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य
- 2001 : राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
- 2010 : सरचिटणीस, भाजप महाराष्ट्र प्रदेश
- 2013 : अध्यक्ष, भाजप महाराष्ट्र प्रदेश
- 2014 ते 2019 : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
- 2019 ते 2022 : विरोधी पक्षनेते
- 2022 ते 2024 उपमुख्यमंत्री
विधिमंडळातील कार्य
अंदाज समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नगरविकास आणि गृहनिर्माणाविषयी स्थायी समिती, राखीव निधीविषयी संयुक्त निवड समिती, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समिती
सामाजिक योगदान
- सचिव, ‘ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटाट फॉर एशिया रिजन’
- नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबत ‘रिसोर्स पर्सन’
- संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळालेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य
- नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष
- नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य
आंतरराष्ट्रीय ठसा
- 99 मध्ये होनोलुलू, अमेरिका येथे ‘इंटरनॅशनल एनव्हार्यमेंट समिट’मध्ये सहभाग आणि सादरीकरण
- 2005 मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन आणि नॅशविले येथे ‘यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स’
- 2006 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे ‘आयडीआरसी - युनेस्को - डब्ल्यूसीडीआर’ यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन अॅण्ड मॅनेजमेंट इन इंडिया’ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण
- चीनमध्ये बीजिंग येथे ‘डब्ल्यूएमओ - ईएसएसपी’ यांनी आयोजित केलेल्या ‘ग्लोबल एनव्हार्यन्मेंटल चेंज काँग्रेस’मध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन - इश्युज ऑन इकोलॉजिकल अॅण्ड सोशल रिस्क’ या विषयी सादरीकरण
- 2007 मध्ये डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरूण राजकीय नेत्यांच्या ‘आसेम’ परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व
- 2008 मध्ये अमेरिकेच्या संघराज्य शासनाच्या ‘ईस्ट-वेस्ट सेंटर’तर्फे आयोजित ‘न्यू जनरेशन सेमिनार’मध्ये ‘एनर्जी सिक्युरिटी इश्युज’ या विषयावर शोधनिबंध सादर
- 2008 मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूरला गेलेल्या ‘कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन’च्या उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य
- 2010 मध्ये मॉस्को येथे भेट देणार्या ‘इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्स’च्या शिष्टमंडळाचे सदस्य
- 2011 मध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटाट’मध्ये सहभाग
- 2012 मध्ये मलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रिजनल मीट’मध्ये सहभाग
- 2012 मध्ये केनियातील नैरोबी येथे ‘युनायटेड नेशन्स हॅबिटाट’ने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य
पुरस्कार आणि सन्मान
- कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशन 2002-2003चा ‘सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार’
- राष्ट्रीय आंतरविद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार
- रोेटरीचा ‘मोस्ट चॅलेंजिंग यूथ’ विभागीय पुरस्कार
- मुक्तछंद, पुणे या संस्थेतर्फे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार, नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार
मुख्यमंत्री कार्यकाळातील परदेश दौरे
- दि. 21 ते दि. 25 जानेवारी 2015 आणि दि. 21 ते दि. 15 जानेवारी 2018 : दावोस (स्वित्झर्लंड) - वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी.
- दि. 12 ते दि. 16 एप्रिल 2015 - जर्मनी हॅनोव्हर मेसी परिषदेसाठी.
- दि. 26 ते दि. 29 एप्रिल 2019 - इस्रायल
- दि. 14 ते दि. 18 मे 2015 - चीन
- दि. 29 जून ते दि. 6 जुलै 2015 आणि दि. 19 ते दि. 22 सप्टेंबर 2016 - अमेरिका
- दि. 8 सप्टेंबर ते दि. 13 सप्टेंबर 2015 - जपान
- दि. 12 ते दि. 16 नोव्हेंबर 2015 - लंडन
- दि. 9 ते दि. 14 जुलै 2016 - रशिया
- दि. 26 ते दि. 29 सप्टेंबर 2017 - दक्षिण कोरिया-सिंगापूर
- दि. 11 ते दि. 14 ऑक्टोबर 2017 - स्वीडन एक्स्पोसाठी
- दि. 9 ते दि. 16 जून 2018 - दुबई, कॅनडा, अमेरिका