राजकारणातला ‘योगी’

    04-Dec-2024
Total Views |


fadnavis
 
राजकारण हे अमृतमंथनासारखे असते, असे म्हणतात. म्हणजे, राजकारणातून अमृतही बाहेर पडते आणि विषही! ते विष पचवणारे ‘निळकंठ’ म्हणजे आमचे नेते देवेंद्र फडणवीस! देवेंद्रजींना राजकारणातले ‘चाणक्य’ अशी उपमा अनेकांनी दिली. ते चाणक्य आहेतच. मी त्यापुढे जाऊन त्यांना राजकारणातला ‘योगी’ असे संबोधेन. कारण, त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख हा परीक्षा पाहणारा ठरला. प्रत्येकवेळी ते त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. हा त्यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. नेतृत्व किती प्रगल्भ असावे, याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. ज्या ज्या वेळी त्यांच्या जीवनात कसोटीचा काळ आला, त्या त्या वेळी त्यांच्यातील नेतृत्वगुण अधिक बहरत गेले. 
 
राजकारण हे अमृतमंथनासारखे असते, असे म्हणतात. म्हणजे, राजकारणातून अमृतही बाहेर पडते आणि विषही! ते विष पचवणारे ‘निळकंठ’ म्हणजे आमचे नेते देवेंद्र फडणवीस! देवेंद्रजींना राजकारणातले ‘चाणक्य’ अशी उपमा अनेकांनी दिली. ते चाणक्य आहेतच. मी त्यापुढे जाऊन त्यांना राजकारणातला ‘योगी’ असे संबोधेन. कारण, त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख हा परीक्षा पाहणारा ठरला. प्रत्येकवेळी ते त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. हा त्यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. नेतृत्व किती प्रगल्भ असावे, याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. ज्या ज्या वेळी त्यांच्या जीवनात कसोटीचा काळ आला, त्या त्या वेळी त्यांच्यातील नेतृत्वगुण अधिक बहरत गेले.
 
2014 ते 2019 हा देवेंद्रजींचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ, पुढे विरोधी पक्षनेते आणि अलीकडे उपमुख्यमंत्री, हा सगळा प्रवास मी जवळून अनुभवला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची स्थिती ही ‘टी-20’ सामन्यासारखी असते. दररोज चौकार-षटकार मारावे लागतात. एखाद्या निष्णात खेळाडूप्रमाणे देवेंद्रजींनी या पदाचा बहुमान वाढवला. आपली सर्व कौशल्ये वापरून त्यांनी महाराष्ट्राला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. वक्तशीरपणा हा त्यांचा अंगभूत गुण आहे. त्याचा त्यांना राजकीय आयुष्यात मोठा फायदा झाला. ते वेळ काटेकोरपणे पाळतात, वेळेचे अचूक नियोजन करतात. दिवसाचे वेळापत्रक ते सक्तीने पाळतात. दुसरे म्हणजे, माणसे शोधण्याची हातोटी. अचूक माणसे हेरून त्यांच्याकडून काम करून घेण्याचे त्यांचे कौशल्य वाखणण्याजोगे आहे. किंबहुना, त्यातच त्यांच्या नेतृत्त्वाचे यश लपले आहे. राज्यभरात त्यांनी योग्य व्यक्ती हेरून जबाबदारीचे वाटप केले. त्यांच्याकडून काम करून घेतले. त्याचे फळ आज मिळत आहे.
 
राजकारणाने अलीकडच्या काळात कुणाच्या संयमाची सर्वाधिक परीक्षा पाहिली असेल, तर त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री असतानादेखील त्यांच्या आयुष्यातील संघर्ष कमी झाला नाही. पुढे विरोधी पक्षनेते आणि उपमुख्यमंत्रिपदाचा काळ कसोटीचा होता. परंतु, प्रत्येक प्रसंगाला धीरोदत्तपणे, संयमाने ते तोंड देत राहिले. त्यामुळेच आज ते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत. संयम हा त्यांचा अंगभूत गुण आहे आणि कालानुरुप तो बहरत गेला आहे. त्यांच्यातील कौशल्य, त्यांचे व्यक्तिमत्त्व, नेतृत्वगुणाला काळानुरुप नवी पालवी फुटत गेली. त्याचा फायदा याआधी महाराष्ट्राला यापुढेही होत होईल.
 

fadnavis 
 
मुंबईसह महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जे महत्त्वाचे पायाभूत प्रकल्प साकारले गेले, त्यात देवेंद्र फडणवीसांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शेतकर्‍यांसाठी सिंचन सुविधा, औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्राला प्रगतीकडे घेऊन जाणे असो किंवा महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे असो, देवेंद्र फडणवीसांची धोरणे त्या त्या वेळी निर्णायक ठरली. त्यांना ‘प्रोग्रेसिव्ह लिडर’ म्हटले जाते. ती क्षमता त्यांनी स्वतःपुरती मर्यादित ठेवली नाही. प्रशासनात ती वृत्ती बाणवली. त्यामुळे महाराष्ट्र शासनात अलीकडच्या काळात जी धोरणे आकाराला आली, त्यात देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिबिंब उमटते.
 
भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीमध्ये योग्य समन्वय राखण्याची जबाबदारी पूर्णतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. आधी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंशी समन्वय राखण्याचे काम त्यांच्याकडे होते. दोन्ही वेळी युतीची हाताळणी त्यांनी यशस्वीपणे केली. महायुती सरकारमध्ये कुठेतरी धुसफूस, हेवेदावे असल्याचे कधी दिसले का? दोन्ही वेळी त्यांनी संवादातील दुरावा कधी कमी होऊ दिला नाही. मुख्यमंत्रिपदावर पाच वर्षे काम केल्यानंतरही उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले, तेव्हा त्यांचा संयम सगळ्यांनी पाहिला. या अडीच वर्षांतील संयमी देवेंद्र फडणवीसांविषयी लिहावे तेवढे कमी आहे. परंतु, एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यामुळे ‘महायुती’ अडीच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला वेगाने पुढे घेऊन गेली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारता’चे जे स्वप्न पाहिले आहे, त्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक राहणार आहे. महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी आहेच, शिवाय हे राज्य देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुढे गेली, तरच देशाची अर्थव्यवस्था पुढे जाणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर देवेंद्रजींवर ही प्रमुख जबाबदारी असणार आहे. दुसरे म्हणजे, महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि महायुतीला भरभरून मतदान केले आहे. त्यामुळे त्यांच्या नव्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. महिला, युवा, शेतकरी, कष्टकर्‍यांच्या अपेक्षांची पूर्ती करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे आणि त्यात ते पूर्णपणे यशस्वी होतील, असे मला वाटते. देवाभाऊंना मुख्यमंत्रिपदासाठी मनापासून शुभेच्छा! महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करावेत, अशी आई भवानी चरणी प्रार्थना.
 
सुमित वानखेडे, आमदार, भाजप