‘पुष्पा ३’ येणार; पोस्टर झालं लीक, अल्लू अर्जुन नाही तर 'हा' अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत?

04 Dec 2024 15:27:04
 
pushpa 3
 
 
मुंबई : अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असणारा पुष्पा २ हा चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. 'पुष्पा २'ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल १०० कोटींची कमाई केली असून त्या रकमेत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एकीकडे ‘पुष्पा २’ ची चर्चा सुरु असताना दुसरीकडे मात्र आत्तापासूनच ‘पुष्पा ३’ बद्दल चर्चा सुरु झाली असून त्यात अल्लू अर्जून नाही तर वेगळाच अभिनेता प्रमुख भूमिकेत दिसणार असेही म्हटले जात आहे.
 
 
 
सध्या सोशल मिडियावर 'पुष्पा ३' चे एक पोस्टर व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टरमध्ये चित्रपटाचे 'पुष्पा ३: द रॅम्पेज' असे नाव दिसत असल्यामुळे चाहते अधिकच आनंदी झाले आहेत. तसेच, अभिनेता विजय देवरकोंडा याने 'पुष्पा'चे दिग्दर्शक सुकुमार यांच्या वाढदिवशी एक फोटो शेअर केला होता. ज्यात 'पुष्पा ३'चा उल्लेख करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, "द राइज, द रुल, द रॅम्पेज..." त्यामुळे आता सोशल मीडियावर 'पुष्पा ३' चित्रपटात साउथ स्टार विजय देवरकोंडा दिसणार अशा चर्चा रंगल्या आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0