पुणे, दि. ४ : ‘विवेक साहित्य मंच’, ‘विवेक व्यासपीठ’ आणि ‘आयईएस’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नुक्कड साहित्य संमेलनानिमित्त होणाऱ्या ‘अ. ल. क (अति लघु कथा) स्पर्धेत’ सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले. या स्पर्धेसाठी अलक पाठविण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर आहे. अलक स्वलिखित असावी, ती मराठीमध्ये असावी, कोणत्याही वादग्रस्त विषयावर लिखाण नसावे असे या स्पर्धेचे निकष आहेत. स्पर्धकांनी अलक viveksahityamanch@gmail.com या मेल आयडीवर नमूद तारखेपर्यंत पाठवायची आहे. निवड झालेल्या स्पर्धकांना ४ आणि ५ जानेवारी रोजी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात होणाऱ्या नुक्कड साहित्य संमेलनात अलक सादर करण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ७०४५७८१६८५/८३७८०८७९९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.