पालघर घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करा!

31 Dec 2024 11:07:48
 
Neelam Gorhe
 
पालघर : पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करा, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
आरोपीचे किराणा मालाचे दुकान असून रविवार दि. २९ डिसेंबर रोजी तो खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीला दुकानात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. त्यानंतर मुलीने घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
 
दरम्यान, "आरोपीचे हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे. अशा नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी," असे निर्देश उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना दिले आहेत. तसेच घटनेचा तपास अधिक जलदगतीने करून आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी. आरोपीला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करावे आणि पीडित मुलीचे समुपदेशन व शालेय शिक्षण चालू राहण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचनाही नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0