महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष लोकल धावणार

03 Dec 2024 12:49:59

central railway

मुंबई, दि.३: प्रतिनिधी 
मध्य रेल्वे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी दि. ५ आणि ६ डिसेंबरच्या मध्यरात्री (गुरूवार-शुक्रवार मध्यरात्री) परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान १२ अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
तपशील खालीलप्रमाणे

अप विशेष

कल्याण- परळ विभाग

कुर्ला-परळ विशेष कुर्ला येथून १.४५ वाजता सुटेल आणि परळ येथे ०१.०५ वाजता पोहोचेल.
कल्याण-परळ विशेष कल्याण येथून ०१.०० वाजता सुटेल आणि परळ येथे २.१५ वाजता पोहोचेल.
ठाणे-परळ विशेष ठाणे येथून ०२.१० वाजता सुटेल आणि परळ येथे २.५५ वाजता पोहोचेल.

मेन लाइन - डाऊन विशेष

परळ- कल्याण विभाग
परळ-ठाणे विशेष परळ येथून ०१.१५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे १.५५ वाजता पोहोचेल.
परळ-कल्याण विशेष परळ येथून ०२.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ३.४० वाजता पोहोचेल.
परळ-कुर्ला विशेष परळ येथून ०३.०५ वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ३.२० वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन अप विशेष

पनवेल - कुर्ला विभाग
वाशी-कुर्ला विशेष वाशी येथून ०१.३० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०२.१० वाजता पोहोचेल.
पनवेल-कुर्ला विशेष पनवेल येथून ०१.४० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०२.४५ वाजता पोहोचेल.
वाशी-कुर्ला विशेष वाशी येथून ०३.१० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ०३.४० वाजता पोहोचेल.

हार्बर लाईन - डाऊन विशेष

कुर्ला - पनवेल विभाग
कुर्ला-वाशी विशेष कुर्ला येथून ०२.३० वाजता सुटेल आणि वाशी येथे ०३.०० वाजता पोहोचेल.
कुर्ला-पनवेल विशेष कुर्ला येथून ०३.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०४.०० वाजता पोहोचेल.
कुर्ला-वाशी विशेष कुर्ला येथून ०४.०० वाजता सुटेल आणि वाशी येथे ०४.३५ वाजता पोहोचेल.
Powered By Sangraha 9.0