मसाप तर्फे दिल्या नवोदित कवयित्री पुरस्कारासाठी प्राजक्ता माळीची निवड

    03-Dec-2024
Total Views |

prajakta Mali
 
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदे तर्फे दिल्या जाणाऱ्या सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कारासाठी यावर्षी अभिनेत्री प्राजक्ता माळीची निवड झाली आहे. १०,००० रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांच्या हस्ते प्राजक्ताला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
 
माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून गेल्या दोन वर्षांपासून एका ज्येष्ठ आणि एका नवोदित कवयित्रीला सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित केले जाते. अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ‘प्राजक्तप्रभा’ हा कवितासंग्रह तीन वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता. या कवितासंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्ता एक कवियित्री म्हणून रसिकांच्या समोर आली होती. झगमगत्या जगण्यापलीकडे कलावंतांना एक मन अशा भावना तीने या कवितासंग्रहात मांडल्या आहेत.