मुंबई : भारतातील प्रसिद्ध आणि आधुनिकतावादी महिला चित्रकारांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रफुल्ला डहाणूकर यांच्या चित्रांचे ‘प्रफुल्ला’ हे चित्रप्रदर्शन मुंबईतील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलेरीमध्ये भरणार आहे. गुरुवार १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. शुक्रवार ११ डिसेंबर पासून हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले होणार आहे. सोबतच ११ डिसेंबर रोजी ‘एशिया सोसायटी इंडिया सेंटर’ तर्फे 'इकोलॉजीज ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन' या विषयावर चर्चासत्र सुद्धा होणार आहे. या चर्चेसत्रात सविता आपटे, गोपिका डहाणूकर आणि बेथ सिट्रॉन सहभाग घेणार आहेत. प्रफुल्ला डहाणूकर यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातील प्रेरणा आणि एक आधुनिकतावादी महिला कलाकार म्हणून त्यांनी या पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रांत निर्माण केलएले अढळ स्थान या विषयांवर आधारित हे चर्चा सत्र असणार आहे. ‘प्रफुल्ला’ हे चित्रप्रदर्शन १६ डिसेंबर पर्यंत प्रेक्षकांना पाहता येणार आहे.