सिडको गृहनिर्माण योजनेत सहभागासाठी मुदतवाढ

27 Dec 2024 12:28:43

cidco



मुंबई, दि.२७ : प्रतिनिधी 
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” या २६,००० घरांच्या महागृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस १० जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सिडकोतर्फे सादर करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत २६,००० सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सदर गृहनिर्माण योजनेकरिता ऑनलाईन अर्जनोंदणी १० जानेवारी २०२५ पर्यंत सुरू राहणार असून, अर्जदारांना https://cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे अर्जदार अधिक माहितीसाठी ९९३०८७०००० व ८०६२३६८००० या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क करू शकतात, अशी माहिती सिडकोने दिली आहे
Powered By Sangraha 9.0