नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने भारताचा रन मशिन विराट कोहलीवर कसोटी सामन्यात गैरवर्तन केल्याप्रकरणी एकूण मानधनांपैकी २० टक्के कपातीची दंडात्मक कारवाई ठोठावली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच घडलेल्या घटनेप्रसंगी आयसीसीने कारवाईचे आदेश दिले. ही घटना गुरूवारी २६ डिसेंबर २०२४ रोजी घडली.
विराट कोहली आणि १९ वर्षीय ऑस्ट्रेलियन खेळाडू सॅम कॉन्स्टास एकमेकांमध्ये भिडले आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. याचपाश्चात विराटवर दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान विराट आणि सॅम कॉन्स्टास यांच्यातील वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
सॅम कॉन्स्टासने एक धाव घेतली. त्यावेळी विराट कोहली समोरून चालत येताना दिसतो. त्यावेळी विराटचा खांदा सॅम कॉन्स्टासला लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. विराटने हे जाणीवपूर्वक केल्याचा आयसीसीचा संशय आहे. यामुळे आयसीसीने २० टक्के दंड ठोठावण्यात आला. याआधी त्याच्यावर १-२ सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. दरम्यान या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्याच दिवशी ६ विकेट गमावून ३११ धावा केल्या.