केंद्र सरकारतर्फे १० हजार प्राथमिक सहकारी संस्थांचे लोकार्पण

24 Dec 2024 18:31:11
Amit Shah

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह ( Amit Shah ), बुधवारी नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत १० हजारांहून अधिक बहुद्देशीय प्राथमिक सहकारी संस्था आणि दुग्ध व मत्स्यपालन सहकारी संस्था राष्ट्रास समर्पित करणार आहेत.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह राष्ट्रीय परिषदेत १० हजारांहून अधिक नव्याने स्थापन झालेल्या बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था, दुग्ध आणि मत्स्यपालन संस्था राष्ट्राला समर्पित करतील. केंद्रीय अमित शाह नव्याने स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रे, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएम वितरित करतील. ही आर्थिक साधने पंचायतींना क्रेडिट सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी आणि आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी तयार करण्यात आली आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील लोक योजनांचा लाभ घेऊ शकतील आणि देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहभागी होऊ शकतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, सहकार मंत्रालय प्रत्येक पंचायतीमध्ये सहकारी संस्थांची स्थापना सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे जेणेकरून विकास आणि स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. स्थानिक स्तरावर नव्या बहुद्देशीय सहकार संस्थांच्या निर्मितीमुळे ग्रामीण भागातील सहकारी संस्थांच्या विकासाला चालना मिळेल. नवनिर्मित बहुउद्देशीय सहकारी संस्था, दुग्ध सहकारी आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांमध्ये पत वितरण संस्था, दुग्ध संस्था आणि मत्स्यव्यवसाय सोसायट्यांचा समावेश आहे.

 
Powered By Sangraha 9.0