दारुच्या नशेत डंपरचालकाने ९ जणांना चिरडलं; दोन लहानग्यांसह तिघांचा जागीच मृत्यू

23 Dec 2024 12:10:51
 
pune accident
 
पुणे : (Pune Dumper Accident) पुण्याच्या वाघोलीमध्ये डंपरने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान तिघांचा यात जागीच मृत्यू झाला आहे. यात दोन लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डंपरचालक गजानन तोट्रे हा मद्यधुंद अवस्थेत होता. आरोपी डंपरचालकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
वाघोली परिसरातील केसनंद फाट्याजवळ रात्री साडे बारा वाजल्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. दारुच्या नशेत असलेल्या डंपरचालकाने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडलं. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या जखमींना ससून रुगणालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डंपरचालक गजानन तोटरे हा मूळचा नांदेडचा आहे तर अपघातातील मृत कामगार हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील आहे. हे कामगार असून रविवारी रात्री अमरावती इथून कामासाठी पुण्यात आले होते.
 
डंपर अपघातातील मृतांची नावे :
 
१) विशाल विनोद पवार, वय २२ वर्ष
२) वैभवी रितेश पवार, वय १ वर्ष
३) वैभव रितेश पवार, वय २ वर्ष
Powered By Sangraha 9.0