राहुल गांधींनी आत्मचिंतन करायला बँकॉकला जावं!

23 Dec 2024 17:33:31

ATUL BHATKHALKAR
 
मुंबई : (MLA Atul Bhatkhalkar) काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी २३ डिसेंबरला परभणी दौऱ्यावर असताना सोमनाश सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना अनेक आरोप केले आहेत. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत राहुल गांधींवर टीकास्त्र डागलं आहे.
 
काय म्हणाले आमदार भातखळकर?
 
राहुल गांधी हे एक बेजबाबदार नेते म्हणून आता पुरेशे प्रसिद्ध झाले आहेत. पोलिटीकल टूरिझम करण्याचा उद्योग चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उत्तर देताना सोमनाश सूर्यवंशी यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय लिहिलंय, त्यांना श्वसनाचा विकार होता हे सगळं सांगितलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत काँग्रेसचे जे तेरा सदस्य आहेत , त्यांनी का ऐकून का घेतलं, त्यावेळेस त्यांनी आक्षेप का नाही घेतला, राहुल गांधी प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. संसद चालू न देण्यामध्ये त्यांचा मोठा रोल होता. आता संसदेच्या बाहेर अधिवेशन संपल्यानंतर इकडं येऊन खोटंनाटं बोलणं आणि वातावरण तापवण्याचा प्रयत्न करणं, याच्याऐवजी राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या जनतेने देशभरातील जनतेने त्यांना का नाकारलं याचे आत्मचिंतन करावं, फारच असेल आत्मचिंतन करायला बँकॉकला जावं." असा टोला अतुल भातखळकरांनी लगावला आहे.
 
दलित असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीला मारलं आणि आरएसएसची विचारधारा संविधानाला संपवण्याची विचारधारा असल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना भातखळकर म्हणाले की, "संविधानाची मोडतोड कोणी केली हे उभ्या देशानं पाहिलंय, या देशात आणीबाणी कोणी आणली हे देशानं पाहिलंय."
 
Powered By Sangraha 9.0