कुर्ला बस अपघाताप्रकरणी संजय मोरेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; परवाना रद्द होणार

    22-Dec-2024
Total Views |
Kurla Bus Accident

मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात ९ डिसेंबर २०२४ रोजी भीषण अपघात ( Kurla Bus Accident ) घडला होता. त्या बस अपघाताच्या जखमा अजुनही ताज्या आहेत. या अपघातप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. बस चालक संजय मोरे याला कुर्ला दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच संजय मोरेचा परवाना रद्द करण्यासाठी आरटीओने प्रक्रिया सुरु केली असल्याचेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

९ डिसेंबर २०२४ रोजी कुर्ला येथे एका भरधाव बसने वेगात रस्त्यावर चालत असणाऱ्या माणसांना उडवले. बसचालकाचा बसवरचा ताबा सुटला व मध्ये येणाऱ्या गाड्या, माणसे यांना धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अजूनही सुरु आहे. यामध्ये बसचालक संजय मोरे याला कुर्ला दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या बसचालकाचा परवानाही रद्द करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.

या प्रकरणासंबंधी संपूर्ण खुलासा करण्यासाठी यंत्रणा कामी लागली आहे. बसचालकाची पूर्ण चौकशी करुन पुढील निर्णय घेण्यात आले आहेत. कुर्ला बस अपघात प्रकरणी बसचालक संजय मोरे यांचा बसवरचा ताबा सुटल्याने हा सर्व प्रकार घडल्याचे निदर्शनात आले आहे.