भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहील! एस.जयशंकर यांची स्प्ष्टोक्ती

22 Dec 2024 19:40:44

jaishankar

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने प्रगतीची नवीन शिखरं गाठली आहेत. जागतिक स्तरावर भारताचे महत्व प्रस्थापित झाले आहे. अशातच भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर भाष्य करतान म्हणाले की स्वातंत्र्य आणि तटस्थ भूमिका यामध्ये कुणीही गल्लत करता कामा नये. भारत कधीही इतरांना आपल्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करू देणार नाही. त्याच बरोबर, राष्ट्रीय हितासह जागतिक हितासाठी जे योग्य आहे ते करत राहिल.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना २७वा SIES श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जयशंकर म्हणाले की प्रगती करत असताना, देशाने आपल्या परंपरा सुद्धा जपल्या पाहिजे. भारताच्या समृद्ध वारशाकडून जग सुद्धा धडे घेऊ शकते. तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा समतोल साधला गेला पाहिजे. आजच्या पिढीने या देशाच्या परंपरा समजून घेतल्या पाहिजे. भारताची प्रगती नक्कीच होईल, पण त्याला आपले भारतीयत्व न गमावता ही प्रगती साधावी लागेल. भारताने गेल्या दशकात हे दाखवून दिले आहे की सर्व आघाड्यांवर विकासाचा पाठपुरावा करण्याची क्षमता, आत्मविश्वास आणि महत्वाचे म्हणजे वचनबद्दता आहे.


Powered By Sangraha 9.0