बंगळुरू : एआय अभियंता अतुल सुभाष यांच्या बंगळुरू येथील आत्महत्येच्या प्रकरणाच्या तापासातून एक बाब उघड झाली आहे. अतुल सुभाष यांची पत्नी निकीता सिंघानियाला त्यांच्याशी विवाह करायचा नव्हता. वडिलांची प्रकृती अस्थिर असल्याने घरच्यांच्या दबावाखाली निकिताने अतुलशी विवाह केला आणि नंतर प्रत्येक गोष्टींची किंवा घटनेची माहिती तिची आई निशाला देत असायची.
याप्रकरणी आता मिळालेल्या माध्यमांच्या अहवालानानुसार, हे नाते तुटण्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे निकिता संघानियाची आई तिला दिवसातून पाच-सहा वेळा फोन करायची आणि तिच्या मुलीला पती आणि सासरच्यांविरोधात अनेकदा भडकवण्याचे काम करायची.
दरम्यान अतुल- निकिताचा विवाह हा २०२० मध्ये वाराणसी येथील एका हॉटेलमध्ये झाला होता. पुढे निकिताच्या वडिलांचे निधन झाले आणि नंतर निकिताने तिचे काका सुशील सिंघायनिया यांचा सल्ला घेतला असल्याचे सांगण्यात आले.