भाड्याने बीएमडब्ल्यू घेतलेल्या वाहनाने कट्टरपंथीने जर्मनीच्या ख्रिसमस बाजारपेठेत ७ भारतीयांना उडवले

    22-Dec-2024
Total Views |
  
German Christmas market
 
बर्लिन : जर्मनीतील मॅग्डेबर्ग शहरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका हल्ल्यात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर यामध्ये एकूण २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात ७ भारतीय नागरिकही जखमी झाले असून त्यापैकी ३ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारत सरकारने संबंधित हल्ल्याला निर्दयी ठरवत त्याचा तीव्र निषेध करण्यात आला. वाहन चालकाचे नाव डॉ. तालेब असे असून तो सौदी अरेबियास्थित आहे. ही घटना शुक्रवारी २० डिसेंबर २०२४ रोजी घडली असल्याचे वृत्त आहे. 
 
आम्ही मॅग्डेबर्गमधील ख्रिसमस मार्केटवरील या क्रूर हल्ल्याचा निषेध करतो, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात सांगण्यातले की, अनेकांचे जीव गेले आणि अनेक लोक जखमी झाले. आमचे विचार आणि प्रार्थना पीडितांच्या पाठीशी आहेत. भारत सरकारने सांगितले होते की, जर्मनी येथील भारतीय मिशन जखमी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सतत संपर्कात आहे आणि शक्य ती सर्व मदत केली जात आहे.
 
या घटनेमध्ये जर्मन पोलिसांनी कार चालक ५० नर्षीय सौदी डॉक्टर तालेब याला अटक केली आहे. गेल्या २० वर्षांपासूनव जर्मनी येथे राहणाऱ्या तालेबने हल्ल्यात वापरलेली बीएमडब्ल्यू चार चाकी वाहन भाडेतत्त्वार घेतले होते. यावेळी सुरूवातीला कारमध्ये स्फोटके असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी हा संशय फेटाळून लावल्याचे सांगण्यात आल्याची माहिती सांगितली आहे.
 
ख्रिश्चनांच्या सणांवर मोठ्या प्रमाणात हल्ले करून मोठ्या प्रमाणांत मुस्लिमांप्रती असलेला द्वेष आहे. याप्रकऱणात जर्मनीच्या गृहमंत्री नॅन्सी फेगर यांनी संशयिताच्या इस्लामोफोबियाची पुष्टी केली असली तरीही हल्ले हे मुख्य कारण असून याप्रकरणी कोणतेही एक वक्तव्य देण्यास नकार दिला. अशातच आता याप्रकऱणात भारताने या हल्ल्यात जर्मनीतीला जखमींना मदत करण्यासाठी सक्रिय प्रयत्न केले आहेत. या घटनेशी संबंधित प्रत्येक बाबतीत एकूण मदत सुरू राहिल, असे आश्वासन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.