कोलकाता : पश्चिम बंगाल येथे पोलिसांनी बंदी घालण्यात आलेल्या अन्सार-उल-इस्लाम या बांगलादेशी दहशतवादी संघटनेतील आठ संशयित सदस्यांना अटक करण्यात आली आहे. प. बंगाल येथील गुडी आणि ईशान्येकडील सात राज्यांना जोडणाऱ्या सिलीगुडी कॉरिडोर (चिकन नेक') भागात मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण करण्याचा मोठा कट रचण्यात आल्याचे बोलले जात होते. याप्रकरणी आता पोलिसांनी दिलेल्या एकूण माहितीनुसार, संबंधित दहशतवादी संघटना भारताच्या ईशान्य भागाशी संपर्क असलेले राज्य एकमेकांपासून तोडण्याची योजना आखली जात होती.
प्रसारमाध्यमाच्या वृत्तानुसार, पोलिसांनी मुर्शिदाबाद येथील जिल्ह्यात अटक करण्यात आलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांकडून १६ जीबी पेन ड्राइव्ह, बनावट ओळखपत्र, आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. अब्बास अली आणि मीनारूल शेख अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. याप्रकरणी आता दिलेल्या माहितीनुसार, जे दक्षिण आणि उत्तर बंगालच्या संवेदनशील भागात अस्थिरता निर्माण करण्याचा तसेच ईशान्य भारतात दहशत पसरवण्याची योजना आखात होते.
सिलीगुडी कॉरिडॉरला चिकन नेक असे बोलले जाते. प. बंगाल येथील सिलीगुडी प्रदेशास भारतातील ईशान्येकडील सात राज्य एकमेकांना जोडले गेले आहेत. त्यांची रुंदी फक्त २२ किलोमीटर आहे. सिलीगुडी कॉरिडॉर भूतान, नेपाळ आणि बांगलादेशास लागून आहे. या प्रदेशात कोणताही एक अडथळा निर्माण झाल्यास ईशान्य भारताचा उर्वरित भागाचा संपर्क भारताशी तुटू शकतो, यामुळे हा परिसर दहशतवाद्यांसाठी नेहमीच संवेदनशील राहिला आहे.
चिकन नेक म्हणजे काय?
चिकन नेक म्हणजेच सिलीगुडी कॉरिडॉर भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. पश्चिम बंगालच्या सिलीगुडी प्रदेशास भारतातील सात ईशान्येकडील राज्यांशी जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. त्याची रुंदी फक्त २२ किलोमीटर आहे आणि हा मार्ग भूतान, नेपाळ आणि बांगलादेशला लागून आहे. या प्रदेशात कोणताही अडथळा निर्माण झाल्यास संपूर्ण ईशान्य भारताचा उर्वरित भागाचा संपर्क देशाशी तुटू शकतो, असे अनेकदा बोलले जाते.