मुंबई : २०२४ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्वाचे ठरले. प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केली. अवघ्या काही दिवसांनी २०२४ हे वर्ष संपेल आणि २०२५ हे वर्ष नव्याने मनोरंजनासाठी सज्ज होईल. जाणून घेऊयात २०२४ या वर्षात कोणत्या टॉप १० चित्रपटांनी तुफान कमाईसह प्रेक्षकांची मने जिंकली. ‘सॅकलिंक’ने २०२४ वर्षातील ब्लॉकबस्टर सिनेमांची यादी दिली आहे. यात हिंदीतील ४ तर आणि ६ दाक्षिणात्य चित्रपटांचा समावेश आहे.
पुष्पा २
२०२४ या वर्षातील सुपरहिट चित्रपट ठरला तो म्हणदे सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २ : द रुल’. ५ डिसेंबर २०२४ ला हा चित्रपट भारतासह संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने १०० कोटींची कमाई करत नवा रेकॉर्ड तयार केला. शिवाय प्रदर्शनानांतर हा चित्रपट हजार कोटींची कमाई करेल असा अंदाज बांधण्यात आला होता आणि खरा ठरला असून जगभरात या चित्रपटाने १५०८ कोटी तर देशात ११६० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसह फहाद फासील आणि रश्मिका मंदाना यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
कल्की २८९८ एडी
अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पादुकोण, कमल हासन यांची प्रमुख भूमिका असणारा ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई केली. २७ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ग्रँड ओपनिंग करून अनेक चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडले होते.या चित्रपटाने देशात ७६७ कोटी तर जगभरात १०४३ कोटींची कमाई केली आहे
स्त्री २
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या हॉरर-कॉमेडी ‘स्त्री २’, या चित्रपटाने जगभरात तब्बल ८७४.५८ कोटी, भारतात ७१३ कोटींची कमाई केली आहे.
देवरा पार्ट १
कोराताला शिवा दिग्दर्शित ‘देवरा: पार्ट १’ चित्रपटाने भारतात ३४५ कोटींची तर जगभरात ४२२ कोटींची केली आहे. तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषेत चित्रपटाला प्रेक्षक उदंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
भूल भुलैया ३
दिवाळीच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या भूल भुलैया ३ या चित्रपटात कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, विद्या बालन व माधुरी दीक्षित अशी तगडी स्टारकास्ट होती. अनीस बज्मी दिग्दर्शित या हॉरर कॉमेडी चित्रपटाने भारतात ३११ कोटी तर जगभरात ३८९ कोटींची कमाई केली.
गोट (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम)
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते थलपती विजय यांच्या ‘गोट’ चित्रपटाने जबरदस्त ओपनिंग केली होती. या चित्रपटाने भारतात २९६ कोटी तर जगभरात ४५७ कोटींची कमाई केली होती.
सिंघम अगेन
रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील सिंघम अगेन या अजय देवगण, करीना कपूर खान, अर्जुन कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाने भारतात २९७ कोटींची तर जगभरात ३७२ कोटींची कमाई केली.
फायटर
हृतिक रोशन, दीपिका पदुकोण व अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘फायटर’ चित्रपटाने भारतात २५४ कोटी तर वर्ल्डवाईड ३५८ कोटी कमावले आहेत.
अमरन
‘अमरन’हा दाक्षिणात्य चित्रपट मेजर मुकुंद वरदराजन यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटात मेजर मुकुंद (शिवकार्तिकेयन) आणि त्यांची पत्नी इंदू रेबेका वर्गीस (साई पल्लवी) यांची प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने भारतात २५३ कोटी तर जगभरात ८० कोटींची कमाई केली.
हनुमान
‘हनुमान’ हा दाक्षिणात्य चित्रपट यावर्षीचा एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. प्रशांत वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाने भारतात २३८ कोटींची कमाई केली. तर जगभरातील इतर देशांत या चित्रपटाने ५७ कोटींची कमाई केली आहे.